नवी दिल्ली: भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ऐवजी दुसरे कोणाला करणार असल्याची बातमी सामनामध्ये चापून आली होती. यावरच आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं कार्य काहीही नसल्यामुळे माहिती द्यावी तर कुणाची द्यावी? त्यामुळे वाईट सवय असलेले संजय राऊत भाजपवर हेतुपरस्पर टीका करतात. त्यांच्या पक्षाचं सरकार असून लोकांसाठी सांगण्यासाठी कोणतीही विकासकामं नाहीत. त्यामुळेच भाजपला लक्ष केलं जाते आहे. महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. १६ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे चालले आहे त्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार तसेच राज्यातील जनतेला जागृत करणार असून केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देणार असल्याचेदेखील नारायण राणे यांनी म्हटले आहे.
सध्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यासह राज्यातील नवीन केंद्रीय मंत्र्यांसोबत भेटीगाठी सुरु आहे. त्यामुळे राजकारणात वेगळ्याच चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान राणे यांनी राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौरा करणार असल्याचे म्हटले आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी ७०० कोटी रुपयांची मदत केली. आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार सांगोला दौऱ्यावर, गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांची घेणार भेट
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
