Share

विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निवासस्थानावर आशा व गट प्रवर्तकांचा मूक मोर्चा

Published On: 

जालना : आशा व गट प्रवर्तकांचे राज्य शासनाचे वाढीव मानधन दिवाळी पूर्वी खात्यावर वर्ग करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवारी सिटू प्रणित आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना जालना जिल्हा कमिटीच्या वतीने गांधी चमन ते आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. परंतु हा मोर्चा पोलिसांनी अंबड चौफुलीवर अडवला. या मोर्चाला महिला जनवादी संघटना, एसएफआय, डीवायएफआय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी शेळके, भुसारे यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले, राज्य सरकारने आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात २०२० व २०२१ मध्ये दोन वेळा आशांना अनुक्रमे २ व १ हजार आणि गट प्रवर्तकना ३ व १२०० रुपयांची वाढ केली आहे. परंतु त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. पहिली वाढ झालेली आहे पण ती एप्रिल २०२१ पासून थकीत आहे. दुसरी १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात आली पण अजून मिळाली नाही. वेळोवेळी संघटनेचे शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांना या अंमलबजवणीसाठी भेटले पण त्याची तेवढी गांभीर्याने दखल घेतलेली नाही.

नुकताच आरोग्य अभियान संचालक महेश बोटले यांनी परिपत्रक काढून एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंतचा थकीत पहिल्या वाढीव मानधनाचा निधी ऑक्टोबर अखेर वितरित करण्याचे जिल्ह्यास आदेश दिले आहेत पण त्यामध्ये १ जुलै २०२१ पासूनच्या दुसऱ्या वाढीच्या निधीचा उल्लेख नाही. आदेश जारी केला असला तरी मागचा अनुभव पाहता जिल्हा पातळीवरील यंत्रणा निधी खात्या आर वर्ग करेलच असे चित्र दिसत नाही. तसेच कोविड भत्ता ५०० रु,कोविड लसीकरण ड्युटी साठी प्रतिदिन २०० रु देण्याचे आश्वासना बद्दलही यामध्ये काहीच उल्लेख नाही यामुळे आशा व गट प्रवर्तकातून संताप व्यक्त होत आहे.

दिवाळीला बेसन-भाकरी खाऊन करणार आंदोलन
राज्य सरकार, प्रशासनातले अधिकारी,कर्मचारी विना मोबदला आशा व गट प्रवर्तकांकडून दबाव टाकून काम करून घेतात. सहा सहा महिने केलेल्या कामाचे मानधन मिळत नाही ही शोकांतिका आहे. बहुतांश आशा विधवा, परित्यक्ता,गरीब कुटुंबातील आहेत. काहींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच त्यांच्या मानधनावर अवलंबून आहे.आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे.दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री अधिकारी यांचे सर्व भत्ते वेतन नियमित होतात आशा चे मानधन द्यायला का निधी नसतो असा सवाल आशा करीत आहेत. दिवाळी मंत्री अधिकारी कर्मचाऱ्यांची होणार आशा गट प्रवर्तकांची शिमगा होणार का? म्हणून दिवाळीपूर्वी दोन्ही वेळी केलेल्या वाढीव मानधनाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात यावी. अन्यथा दिवाळीच्या दिवशी आरोग्य मंत्र्यांच्या घरी बेसन भाकर खाऊन दिवाळी साजरी करु, असा इशारा देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!