मुंबई : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा एका मोठ्या अपघातातून बचावला. सुयशच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश एका कॅबने प्रवास करत होता. रस्त्यावर अचानक एका मालवाहतूक गाडीची सुयशच्या कॅबला जोरदार धडक लागली. कार रस्त्याच्या कडेला लोटली गेली. कॅबमध्ये ड्राइव्हर आणि सुयश हे दोघेच होते. इतका मोठा अपघात होऊनही सुयश आणि कॅब ड्रायव्हरचे नशीब बलवत्तर होते, की त्यांना कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या दुर्घटनेत त्या कॅबचे नुकसान झाले.
https://www.instagram.com/p/CL1enWPBKZg/?utm_source=ig_web_copy_link
सुयशच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर सुयशने सोशल मीडियावर सुखरुप असल्याची माहिती दिली. ‘तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी सुखरुप आहे आणि मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. माणुसकी अजूनही जिवंत आहे’, अशी पोस्ट सुयशने लिहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक


