🕒 1 min read
बीड : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काही फसव्या योजनांना बळी पडणाऱ्यांबरोबरच मोबाईल टॉवर लावून लाखो रुपये कमविण्याचे स्वप्न पाहून अनेक जण फसत आहेत. असाच एक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ‘तुम्हाला तुमच्या जागेत मोबाइल कंपनीचे टॉवर मिळवून देतोे’ अशी थाप मारुन एका भामट्याने गेवराई तालुक्यातील मानकापूर येथील एका शेतकऱ्याची ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चकलांबा ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार १७ ते २२ डिसेंबर २०२० या कालावधीत मानकापूर येथे घडला. नारायण साहेबराव काशिद (रा.मानकापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांना एका अनोळखी इसमाने ‘तुम्हाला मोबाइल कंपनीचे मोबाइल टॉवर देतो’ असे आमिष दाखवत अॅक्सेस बँकेच्या वेगवेगळ्या तीन खात्यांवर एकूण ५५ हजार १५५ रुपयांची रक्कम जमा करण्याचे सांगितले. मात्र, ही रक्कम जमा करुनही टॉवर न मिळाल्याने काशिद यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, त्यानंतर त्यांनी फिर्याद नोंदवली.
मोबाईल टॉवरबाबत फसवणूक झाल्यास सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. अशा प्रकारातील गुन्हेगार परदेशातून काम करतात. काही प्रकार ईशान्य भारत, कोलकाता या भागातूनही होतात. बँकांनी अशा संशयास्पद खातेदारांची माहिती त्वरित पोलिसांना दिली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
- महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन


