🕒 1 min read
औरंगाबाद : बिडकीन-निलजगाव रोडवर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्यात. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की यावेळी दुचाकीला आग लागून ती भस्मसात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हरिश्चंद्र उत्तमराव गोर्डे ( वय ५० ) हे पत्नी गीताबाई गोर्डे (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीवरून निलजगावहून बिडकीनकडे काही कामानिमित्त जात होते. यावेळी कारने (टी. एन ७८ एक्स ८५२५) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दोन्ही गाड्यांचा अपघात होऊन दुचाकी चालक हरिश्चंद्र गोर्डेंचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गीताबाई गोर्डे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज उदावंत, पोलिस उपनिरीक्षक मोरे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे, सतीश बोडले, अर्जुन जोडले यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. त्यात ती जागीच जळून खाक झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
