🕒 1 min read
औरंगाबाद : नांदेडमध्ये आज एक अजब प्रकार समोर आला आहे. ‘मला मणक्याचा त्रास आहे. कार्यालयात गाडीवर येत असल्याने तो त्रास अजून वाढत आहे. त्यामुळे मला घोड्यावरुन कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात यावी’ अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने केली आहे. कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी असलेले सतीष पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रावरून सोशल मीडियावर चांगलीच हास्यजत्रा सुरू झाली आहे. दिवसभरात अनेक सरकारी कार्यालयातही या पत्राचीच चर्चा सुरू होती.
काय आहे पत्र?
‘मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड इथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टु व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावरून बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, ही विनंती’
या पत्रावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स तयार झाले आहेत. एका नेटकऱ्याने तर चक्क सतिष देशमुख यांनाच काही सल्ले दिल्याचा मेसेज तयार केला आहे. या सुचना वजा सल्ल्यांचीही चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. केवळ गमतीसाठी तयार केलेला काय आहे तो व्हायरल मेसेज.
वाचा..
१)घोडा खरेदी करण्यासाठी dept ची घेतलेली परवानगी
२)घोडा हाच प्राणी खरेदी करण्याचे प्रयोजन काय?
३) घोड्याची रंग, उंची, लांबी किती असेल?
४) वन्यजीव विभागाची परवानगी सोबत जोडावी
५) घोड्याने केलेली घाण काढण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे?
६) घोडा बांधण्यासाठी आपण निवडलेली जागेचा नकाशा, उतारा सोबत जोडावा.
७)जागा मालकाची घेतलेली परवानगी सोबत जोडावी.
८) घोडा हाताळण्यासाठी आपण प्रशिक्षण घेतले आहे का? घेतले असल्यास दाखला सोबत जोडावा
९) घोडा उधळल्यास जबाबदारी कोणाची राहील हे आपल्या अर्जात नमूद केलेले नाही
१०) घोड्याच्या चाऱ्याची आपण काय व्यवस्था केलेली आहे?
११) आपण पुरवण्यात येणारा चाऱ्याची अन्न व औषध विभागामार्फत दररोज तपासणी करून घेणे बंधनकारक राहील.
१२) घोड्यास बांधण्यासाठी शेड बांधण्यासाठी येणारा खर्च आपणास करावा लागेल.
१३) वन्य जीव हाताळणी कायदा अंतर्गत शेडमधील तापमान नियमित ठेवण्यासाठी तेथे एसी बसवावा लागेल.
१४) याव्यतिरिक्त वेळोवेळी इकडील कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे आपणास पालन करणे बंधनकारक राहील.
१४) वरील सर्व अटींची पूर्तता कराव्यात किंवा आपली मणक्याचे शस्त्रक्रिया करून घ्यावी.
या मेसेजमुळे तुम्हाला समजले असेल की सतिष देशमुख यांनी आज अख्ख्या महाराष्ट्राची करमणूक केली आहे. शिवाय यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंनी केली मागणी, आदिती तटकरेंकडून तत्काळ पूर्तता
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- तर औरंगाबादमधील ‘हा’ भाग होणार लॉकडाऊन
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
