Share

तर औरंगाबादमधील ‘हा’ भाग होणार लॉकडाऊन

Published On: 

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (दि. २) पत्रकारांशी संवाद साधताना दिला.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोबतच विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवरच मंगळवारी आयुक्त पांडेय यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी सांगितले की, शहरात फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवडयापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९९ इतकी होती. मात्र तिसर्‍या आठवड्यात अचानकपणे बाधित रुग्णांची संख्या १९९ ते २६१ पर्यंत वाढली आहे. मागील तीन महिन्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असून मंगल कार्यालय, शाळा, कोचिंग क्लासेसला परवानगी दिली. त्याचा परिणाम कोरोनाच्या रुग्ण वाढीवर दिसून आला.

बाधित रुग्णसंख्या अचानकपणे का वाढत आहे हे अद्याप समोर आलेले नाही. १९ फेब्रुवारी रोजी १४३, २० रोजी १२६, २१ रोजी १८४, २२ रोजी १०४, २३ रोजी २१९, २४ रोजी २६२ बाधित रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे. मात्र गतवर्षी जी गंभीरता जाणवत होती, ती आता जाणवत नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!