Share

लातुरात वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला; मात्र फिराद द्यायला कोणीही पुढे आले नाही

Published On: 

लातूर: जिल्ह्यातील किल्लारी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुध्द कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या तहसीलच्या पथकास वाळू माफियांनी मारहाण करुन जिवे मारुन नदीत फेकण्याची धमकी दिली. शुक्रवारी ही घटना घडली असून, याप्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्लारी परिसरातून गेलेल्या तेरणापात्रातून वाळूची फार मोठी चोरी होत असते.

अवैध मार्गाने चोरलेली वाळू लातूर सह उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री होत असते. शुक्रवारी औसा तहसील कार्यालयाचे वाळू विरोधी पथक तलाठी विकास बिराजदार, तलाठी रोहित धावडे, कोतवाल महादेव अंधारे, किशोर लोखंडे, अजय लांडगे हे २१ मे रोजी तहसीलच्या आदेशाने तेरणा पात्रात आले असता वाळू माफियांनी त्यांना कार्यवाहीला विरोध करत दहा बारा जणांनी जमून पथकासच मारहाण केली. मात्र या वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाचे कधीही लक्ष गेले नाही. अचानकच किल्लारीत आलेल्या या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याने वाळू माफियांचा ‘खरा बोलविता धनी’ कोण? असा सवाल केला जात आहे. शिवाय वाळू माफियांनी हल्ला केलेल्या पथकातील एकाही कर्मचाऱ्याने फिर्याद देण्याचे ‘धाडस’ का केले नाही? असाही सवाल केला जात आहे.

पुन्हा नदीपात्रात आलात तर मारून नदीत फेकू, अशी धमकी देत एक ब्रास वाळूने भरलेला ट्रक्टर पळवून नेला. आरोपी मधुकर दंडगुले, सुधाकर दंडगुले, दिनेश दंडगुले (रा. किल्लारी) व इतर सोळा जणांवर तहसीलदार शोभा पुजारी यांच्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलिसांनी आर. एन. ओ. ९७/२१ कलम ३५३, ३३२, ३७९, ३४१, ५०६, १४३, १८८, २६९ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम महाराष्ट्र कोविड १९ अधिनियम अशा विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!