Share

पैसे घेवून पसार झालेला ट्रकचालक गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : वाळू भरुन आणण्यासाठी दिलेला ट्रक व पैसे घेवून पसार झालेल्या ट्रक चालक अनिल रामसिंग जोनवाल (वय ३२, रा. खांडील पिंपळगाव ता. खुलताबाद) याला हर्सुल पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेत असलेल्या ट्रकचालकाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी शनिवारी (दि.२२) दिले.

हर्सुल परिसरातील अंबीका नगरात राहणारे सुभाष सुखदेव बांबुर्डे (वय ३८) यांच्या ट्रकवर अनिल जोनवाल हा ट्रकचालक म्हणून काम करीत होता. ५ फेब्रुवारी रोजी बांबुर्डे यांनी ट्रकचालक अनिल जोनवाल याला वाळु भरून नंदुरबार येथे जाण्यासाठी व ट्रक क्रमांक (एमएच-४४-यू-७१३१) मध्ये डिझेल भरण्यासाठी ३५ हजार रूपये दिले होते.

दुसऱ्या दिवशी बांबुर्डे यांनी जोनवाल याच्या फोनवर संपर्क केला असता त्याने घरी येत असल्याचे सांगितले, तसेच रस्त्यावर ट्राफिक असल्याचे सांगत फोन कट केला होता. त्यानंतर बांबुर्डे यांनी वारंवार अनिल जोनवाल याच्याशी संपर्क केला असता तो फोनवर उडवा-उडवीची उत्तरे देवून फोन बंद करीत होता. अनिल जोनवाल याने ट्रक चोरून नेल्याचे लक्षात आल्यावर सुभाष बांबुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जोनवाल विरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!