मुंबई – सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली… लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागला असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.२६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
या देशात भाजपचे सरकार आहे मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते आहे. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते मात्र राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी उत्सव साजरा करु नका असा आदेश काढला आहे ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- लुटेरी दुल्हन! सोनू शिंदे युवतीचा कारनामा, चक्क १३ लग्न करत १३ मुलांना लाखोंना गंडवले
- वडिलांच्या मृत्युला रुग्णालयच जबाबदार असल्याचा संभावना सेठने केला आरोप
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
- ‘माझा होशील ना’ मालिकेला रंजक वळण; सईला आदित्य देणार खास सरप्राईज
- चाहत्याच्या प्रश्नावर सूर्यकुमारने दिले अभिनास्पद उत्तर ; विराट-धोनीबद्दल विचारला होता प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

