औरंंगाबाद : बोगस खरेदीखताआधारे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पित्याने मुलासह त्याच्या साथीदारांविरुध्द फसवणुकीची तक्रार दिली. हा प्रकार २२ मार्च २०१९ रोजी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी परमजीतसिंग गुरुचरणसिंग डुजा, राजू हबीब शेख (रा. साजापूर), शेख फारुख सांडू, प्रविण सखाराम सिलेदार आणि फौजी हॉटेलच्या मालकाचा मुलगा सांबा अशा पाच जणांविरुध्द सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानपुरा भागातील गुरुचरणसिंग डुजा यांच्या नावे पडेगावात तीन प्लॉट आहेत. या तिन्ही प्लॉटचे गुरुचरणसिंग यांचा मुलगा परमजीतसिंग याने साथीदार सांबा, राजू शेख, शेख फारुख, प्रविण सिलेदार यांच्या मदतीने बोगस खरेदीखत तयार केले. त्याआधारे त्याने फेरफार करुन प्लॉट बळकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावरुन गुरुचरणसिंग यांनी सातारा पोलीस ठाणे गाठत शनिवारी तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मारुती दासरे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
- राजकीय खळबळ! ‘पेगासस’च्या मदतीने ३०० प्रतिष्ठित नागरिकांवर केंद्राची हेरगिरी
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

