मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
या सर्व समस्यांना सामोरे जाऊन समाजातील ‘रियल हिरो’ म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स जोमाने काम करत आहे. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगणने आता कोरोना रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अजयने धारावीमध्ये व्हेंटिलेटर दिले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता अजयने आणि बॉलिवूडमधील काही कलाकरांनी मुंबई महापालिकेसाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईडच्या हॉलमध्ये एक इमर्जन्सी युनिट स्थापन केले आहे.
अजय देवगनने आपल्या सिनेसृष्टीतील मित्रांसोबत बीएमसीला सुमारे १ कोटी रुपयांची मदत केली आहे. याद्वारे २० आयसीयू बेड बनविण्यात आले आहेत. हे बेड्स मुंबईच्या शिवाजी पार्क भागात ठेवण्यात आले आहेत. वृत्तानुसार अजय देवगणच्या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम बीएमसीला देण्यात आली आहे.
या कोविड आयसीयूमध्ये पॅरा मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर सांभाळत आहेत. हे रुग्णालय शिवाजी पार्कपासून फारसं दूर नाही. हिंदुजा हॉस्पिटलचे सीओओ जॉय चक्रवर्ती यांनी सांगितल की, हे हिंदुजा हॉस्पिटलचा एक्सटेंशन असल्याचे सांगितलं जिथे सर्व व्यवस्थापनाद्वारे जेवण, मेडिकल, नर्स देण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता जनतेने केंद्र सरकारविरोधात बंड पुकारले पाहिजे’
- उस्मानाबादेत कोरोना बाधित रुग्णांचा गावभर मुक्त संचार!
- सीएम रिलीफ फंडात बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार देणार एक महिन्याचे मानधन
- ‘केंद्र सरकारने जबाबदारी राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले’
- ‘न्यायालयांनी कोरोनासह अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेही सांगा कधी तरी’


