मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी (२८ फेब्रुवारी )या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गेल्या चार दिवसांपासून हा राजीनामा जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असला तरी कोणतीही कारवाई न केल्याने काल भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राजीनाम्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली होती. राज्यपाल कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केल्याची माहिती दिली आहे. यामुळे, आता पूजा चव्हाण प्रकरणी पुढील तपास कसा होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजीनामा हे पहिलं पाऊल असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल पूजाला न्याय मिळायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा मंजूर करायला ४ दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडचा राजीनामा मंजूर करायला चार दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार?’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- मैदानात बेन स्टोक्स आणि विराट एकमेकांना भिडले; वादएवढा वाढला कि अंपायर्सनी…
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
