🕒 1 min read
अहमदाबाद : अहमदाबाद येथे पार पडलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडच्या संघाला दोन दिवसांच्या आतच पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले. मात्र गुरुवारपासून अहमदाबादमध्येच सुरू झालेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 205 धावांमध्येच आटोपला. अहमदाबादमधील ठणठणीत खेळपट्टीवर जो रूटचा संघ गडगडला.
अक्षर पटेल (4 बळी), रविचंद्रन अश्विन (3 बळी), मोहम्मद सिराज (2 बळी) व वॉशिंग्टन सुंदर (1 बळी) या हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत पाहुण्यांचा डाव संपुष्टात आणला. तिसऱ्या कसोटीतील पराभवाला खेळपट्टीला जबाबदार धरणाऱ्या इंग्लंडची चौथ्या कसोटीतील पहिल्या डावातील अवस्था पाहून ‘खेळता येईन अंगण वाकडे’ असेच म्हणावेसे वाटते. भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेरीस 1 बाद 24 धावा केल्या असून आता टीम इंडियाचा संघ 181 धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (४ मार्च) भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
अहमदाबाद हे अक्षरचे घरचे मैदान असून त्याने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या झॅक क्रॉली, डॉमनिक सिब्ली, डॅनिएल लॉरेन्स आणि डॉमनिक बेस यांना बाद केले. त्याच्या पहिल्या डावातील गोलंदाजी प्रदर्शन २६ षटके ६८ धावांत ४ विकेट्स असे राहिले. यासह त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्या ५ कसोटी डावांपैकी ४ डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्यामुळे साल २००० नंतर कारकिर्दीतील पहिल्या ५ कसोटी डावात सर्वाधिकवेळा ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो केवळ दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा अजंता मेंडिस आहे. अजंता मेंडिसने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्या पाचही डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे मेंडिस हा कसोटी इतिहासातील असा दुसराच खेळाडू आहे, ज्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या पाचही डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याआधी १८९० साली जेजे फेरिस यांनी असा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
