Share

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही; भाजपातील वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावेच लागेल

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- भाजपचे काही लोक सध्या स्वतःच्या प्रसिध्दीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत असून ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता खुश आहे. मात्र त्यांच्यावर होणारी एकेरी टीका कधीही शिवसेना खपवून घेणार नाही. लोकशाही आहे त्यामुळे आंदोलन कोणीही करावेत, त्यास विरोध नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. भाजपातील या वाचाळवीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल व शिवसेनेची ताकद दाखवावीच लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिला आहे. शिवसेनेच्या पक्ष बांधणीसह सभासद नोंदणीची कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

राजेंद्र दळवी पुढे म्हणाले की, भाजप नेते नैरश्यामधून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना अजूनही राज्यांमध्ये सत्तेवर येण्याचे स्वप्न पडत आहेत, परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार असून पुढील सत्ता देखील शिवसेनेची येणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना सध्या काही काम नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तेंव्हा ते समोर कोण आहेत हे पाहणार नाहीत. शिवसेना आणि शिवसैनिक जशास तसे उत्तर कसे देतात याचा विसर भाजपवाल्यांना पडू नये, असा इशारा दळवी यांनी दिला आहे.

यावेळी जेष्ठ नेते बळीराम यादव, तालुकाप्रमुख दीपक शहाणे, महावीर बोरा, तालुका उपप्रमुख सुभाष जाधव, राशीनचे शहर प्रमुख नाझीम काझी, अविनाश जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!