Share

आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे २००० रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहेत. पण, अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. एप्रिल अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होईल, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार १० कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये जाहीर करेल. कृषी मंत्रालयाने आपल्या वतीने सर्व कामे पूर्ण केली आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला आहे. पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी ६५ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. २५ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी ९ कोटी शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले. इतर लोकांची पडताळणी होताच पैसे पाठवण्यात आले.

पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तयार केलेल्या नियमांनुसार शेतकऱ्याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे. जमीन जर शेतकऱ्याच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत आयकर विवरणपत्र भरणारे, डॉक्टर, वकील आदींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!