Share

मोठी बातमी : भाजपच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

Published On: 

नागपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

देवतळे यांनी 2014 पर्यंत तब्बल चार वेळा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2014 मध्ये मंत्री असतानाच ते लोकसभेची निवडणूक लढले व पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजप कडून रिंगणात उतरले. मात्र त्यावेळी ही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये भाजप शिवसेनेची युती झाली. वरोराची जागा सेनेकडे गेली. त्यामुळे देवतळे हे शिवसेनेकडून लढले. शेवटी 2020 मध्ये गडकरींच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!