मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच ‘धमाका’ चित्रपटाचा लुक शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो निळ्या रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये दिसत आहे. चष्मा आणि लांब केस, सूट मध्ये दिसत आहे. त्याच्या पोशाखात टीआरटीव्हीचा बॅज आहे. आणि शर्टवर लाल डाग आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन नव्या प्रोजेक्ट धमाका मध्ये दिसणार आहे.
‘धमाका’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील कार्तिकची व्यक्तिरेखा अर्जुन पाठक आहे. चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. राम माधवानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. 12 डिसेंबरपासून कार्तिकने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
‘धमाका’ चित्रपटाची कथा मुंबईवर आधारित असणार आहे. याआधी कार्तिकने ‘पती पत्नी ओर वो’ या चित्रपटात काम केले होते. यात कार्तिकसह भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कार्तिकने आधी स्वीकारलेल्या भीमाकांपेक्षा ‘धमाका’ चित्रपटातील त्याची भूमिका फार वेगळी आहे. तरी चाहते त्याच्या या भूमिकेला किती प्रतिसाद देणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
https://www.instagram.com/p/CJDFFlZJ0Ex/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते’
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर


