Share

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या ग्रामपंचायतीनेही दिला आता प्रकल्पाला पाठिंबा

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे.राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरीला आता पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आता समोर येत आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी विरोधात असणाऱ्या राजापूर तालुक्यातील विलेय ग्रामपंचायतीनं आता रिफायनरीच्या पाठिंब्याचा ठराव संमत केला आहे. मासिक सभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. त्यानंतर राजापुरच्या तहसिलदारांकडे हा ठराव सुपूर्द देखील करण्यात आला आहे.

इतकंच नाही तर ग्रामपंचायतीच्या वतीनं एक पत्र देखील शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ स्थानिक नेते, पदाधिकारी समर्थन करत होते. पण, आता थेट ग्रामपंचायतीकडून रिफायनरीच्या समर्थनार्थ ठराव करण्यात आला आहे. शिवाय विलये दशक्रोशी समर्थन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता रिफायनरी आणि त्यासंदर्भातील वाढता पाठिंबा याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत.

दरम्यान,नुकतेच राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल उचलंलं आहे. त्यानुसारी दुसऱ्या प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली गेली आहे. यामध्ये 34 जणांना समावेश असून राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी समितीच्या अध्यक्षपदी आहेत.देवाचे गोठणे-सोलगाव-नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती असं या समितीचं नाव आहे.

गावांमध्ये समन्वय राखला जावा या दृष्टीनं ही दुसरी समिती स्थापन केली गेली आहे. त्यामुळे रिफायनरीसाठी समर्थक सर्वकाही करत असून राजकीय इच्छाशक्ती वर या प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगावच्या सड्यावर प्रकल्प व्हावा यासाठी सध्या सर्वच स्तरातील प्रकल्प समर्थक आपली ताकद लावताना दिसून येत आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत थोडक्यात माहिती

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!