Share

निवडकर्त्यांनी 48 तास दिले नाहीत; कोहलीचा मोठा खुलासा

Published On: 

नवी दिल्ली : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ तेथे ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. विराट कोहलीने वनडे मालिकेतून विश्रांती घेतल्याचे वृत्त आहे. मुलीच्या पहिल्या वाढदिवसामुळे तो कसोटी मालिका खेळून भारतात परतणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषदेत या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.

दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, तो दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. पुढे विराट कोहली म्हणाला की, निवडकर्त्यांनी त्याला 48 तास दिले नाहीत. त्या बैठकीतच मला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडू नये असे सांगण्यात आले नव्हते याचा देखील खुलासा केला आहे.

विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला स्वतःहून कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तास दिले होते असे सांगण्यात आले. मात्र, कोहलीने आता या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच बीसीसीआय अधिकारी सौरभ गांगुली यांनी प्रतिक्रिया देत कोहलीला टी- २० कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते. यावर देखील कोहलीने प्रतिक्रिया दिली.

विराट कोहलीने रोहित शर्मा लवकर बरे होण्यासठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच रोहीतची कसोटी मालिकेतील अनुभवाची उणीव भासेल  मी  असे देखील म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!