🕒 1 min read
नवी दिल्ली : रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय कर्णधारपद दिल्यानंतर कोहली आणि रोहितमध्ये काही ठीक नसल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विराट कोहली एका दिवसानंतर भारतीय संघासोबत क्वारंटाईनमध्ये सामील झाला होता आणि त्याआधी रोहित दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. यावरून एक साधा मुद्दा पुढे येतो की दोन कर्णधारांमधील मतभेदात काही तथ्य आहे. बीसीसीआयनेही हा मुद्दा हलक्यात घेतलेला नाही आणि दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर दोन्ही कर्णधारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
इतर खेळाडूंप्रमाणे विराट कोहलीही सोमवारी संघात सामील होणार होता, परंतु त्याने एका दिवसानंतर बीसीसीआयला आपल्या समावेशाची माहिती दिली, त्यानंतर रोहित शर्माने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली. विराट कोहलीने त्याच दिवशी सांगितले की, तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडत आहे. कारण त्याला त्याच्या कुटुंबासोबत आणि आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला हजर राहायचे आहे.
BCCI अधिकाऱ्याने मंगळवारी म्हंटले आहे की, ‘विराट कोहलीने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवणे हलक्यात घेतले नाही. सध्या जे काही घडत आहे ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे.’
बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्यातील मतभेदाला स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र, तो आता समोर आला आहे. निवडकर्त्यांनी आणि बीसीसीआयने विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे सोपवले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार पाहिजे या कारणामुळे रोहित कडे एकदिवशीय कार्धार्पद सोपवण्यात आले आहे.
पुढे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘आम्ही दोन्ही कर्णधारांसोबत बसून तोडगा काढू. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवणे हे संघाच्या भल्यासाठी होते आणि विराट कोहलीने अशी प्रतिक्रिया व्यक्त करायला नको होती. त्याने संघासाठी खूप काही केले आहे आणि संघाला नेहमीच पुढे ठेवले आहे. जे घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘आम्ही युपीएचा भाग नाही पण..’, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
