Share

‘मला राष्ट्रवादी, शिवसेनेची ऑफर पण…’, रुपाली पाटील यांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी काल रात्री (१४ डिसें.) आपल्या मनसे (MNS) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. वसंत मोरे, (Vasant More) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, मात्र आता काही बोलणार नाही, योग्य वेळी उत्तर देणार असे रुपाली पाटील म्हणाल्या तसेच राज ठाकरे (Raj Thackrey) हे माझे दैवत आहेत, होते आणि राहतील असेही त्या यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, मी मुंबईत काल वैजापूर ऑनर किलिंग संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. याशिवाय युवा सेनेच्या वरुण सरदेसाई यांचीदेखील भेट घेतली. मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे. मी राज ठाकरे यांच्याकडे पाहूनच मनसेमध्ये आले आहे. संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे.

संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन. मी पण त्यांच्या बरोबरचं तयार झालेली आहे. १४ वर्ष काम करत असताना माझ्याकडून सर्वसामान्य लोकांकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत असताना माझ्या पक्षाला, माझ्या नेत्याला त्रास होऊ नये, अशी माझी भूमिका होती.

मला ऑफर आलेल्या आहेत मात्र मी आता काही ठरवलेलं नाही. माझ्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ऑफर आहे. माझ्या स्टाईलनं मला स्वीकारतील त्या पक्षात जाईन. तोपर्यंत माझ्या प्रतिष्ठानंच काम करेन, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

मी राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना माझ्या स्वार्थासाठी वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळे मी राजीनामा देत आहे. लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवले आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्येच बदल घडवावा लागेल, असेही रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!