🕒 1 min read
मुंबई : विजय हजारे करंडक (Vijay Hazare Trophy) स्पर्धेच्या पाचव्या एलिट गटात महाराष्ट्राने चंदीगडवर ५ गडी राखून मात केली. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार 168 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक आहे. या शतकासह गायकवाडने विराट कोहली, (Virat Kohli) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal ) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
ऋतुराज गायकवाडच्या आधी विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि पृथ्वी शॉ यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका मोसमात चार शतके झळकावली आहेत. देवदत्त पडिक्कलने सलग चार डावात शतक झळकावले.
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत रुतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर त्याने आता आपली पातळी आणखी उंचावली आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 16 सामन्यात 635 धावा केल्या. त्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचाही समावेश आहे.
ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक धावा केल्या आहेत.
136(112)-मध्य प्रदेश
154*(143)-छत्तीसगड
124(129)-केरळ
21(18)-उत्तराखंड
168(132)- चंदीगड
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘आम्ही युपीएचा भाग नाही पण..’, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
