Share

Maratha reservation strike : छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी; डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या ६० तासाहून अधिक काळ झाले खासदार संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

त्यांची बॉडी हायपोप्लासियात गेली आहे. यात त्यांचा ब्लड शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे. (Chhatrapati Sambhaji Raje sugar level and blood pressure decreased) सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इन्जेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, ते उपोषणावर असल्याने त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे. दरम्यान आझाद मैदानात रुग्णवाहिका दाखल झाली आहे.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1498134865794920450

दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर चर्चा होणार आहे. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!