Share

अठरा महिन्यांची पूर्वसुचना न देता शाळा बंद करता येणार नाही, शिक्षणाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Published On: 

औरंगाबाद : शहरातील महाराष्ट्र पब्लिक स्कूलने दौलताबाद पाठोपाठ आकाशवाणी महेश नगर येथील पाचवी ते दहावी माध्यमिक विभाग शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावास अमान्य करत शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा नियमित सुरू ठेवावी असे स्पष्ट केले आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करत पालकांनी आंदोलन केले होते. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

औरंगाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय अनेक संस्था घेत आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चिकलठाण्यातील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा शाळा बंदचा प्रकार सुरू असतानाच शहरातील महाराष्ट्र पब्लिक स्कूल प्रशासनानेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शाळेतील पालक चिंतेत होते. दौलताबाद, महेशनगर अशा शाळेतील पाचवी ते आठवीचे वर्ग बंद करण्याच्या निर्णयाने पालक गोंधळून गेले होते. शाळा व्यवस्थापन, शिक्षण विभागात पालकांनी निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केरुन निवेदन दिले होते.

शाळेने विद्यांर्थ्यांच्या ऑनलाइन वर्गाच्या ग्रुपवर शाळा बंद करण्याचा संदेश पाठवला. शाळेने अचानकपणे पाचवी ते दहावीचे सर्व वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पालक गोंधळात पडले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या बाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळेला नोटीस पाठवित शाळा बंद करण्याचा प्रस्ताव अमान्य करण्यात येत असल्याचे कळविले आहे. यानंतर शाळा प्रशासन काय करते याकडे विद़यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!