Share

उघड्यावर फेकत असलेला जैविक कचरा सरपंचानी पकडला

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे देशभरातील अनेक नागरिक कामाच्या शोधार्थ या ठिकाणी वास्तव्यास आहेत. यामुळे परिसरातील विविध गावात लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात असून, गल्ली-बोळात खासगी दवाखाने सुरू आहे. यामध्ये बोगस तर काही अधिकृत दवाखान्यांचा समावेश आहे. मात्र अशा दवाखान्यातून बाहेर पडणारा बायोवेस्ट मेडीसीन म्हणजेच जैविक कचऱ्याची योग्य स्थळी विल्हेवाट लावली जात नाही. यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका मुके जनावरे दगावली आहेत. या हाँस्पिटलमधून बाहेर पडणारा बायोवेस्ट मेडीसीन कचरा हा शनिवारी सकाळी वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गरड यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला.

बजाजनगरातील साई हाँस्पिटलमधील बायोवेस्ट मेडीसीन कचरा हा उघड्यावर विल्हेवाट लावण्यासाठी दोन व्रुद्ध व्यक्ती नेहमीप्रमाणे एका ट्राँलीतून घेऊन जात होते. मात्र हा प्रकार काही तरुणांच्या लक्षात आला. त्यामुळे ही माहिती त्यांनी सरपंच यांच्या कानावर टाकली. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तात्काळ धाव घेत, ही ट्राँली थाबवून माध्यमांना कळवली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खासगी हाँस्पिटलचा हलगर्जीपणा समोर आला. तसेच यापूर्वी देखील हा हलगर्जीपणा घडला असल्याचे लोकप्रतिनिधीचे म्हणणे असून, उपचारादरम्यान एक बालक देखील दगावल्याची घटना घडली आहे. हा प्रकार नेहमीच अधूनमधून घटत असून, अशा मुजोर डॉक्टर आणि दवाखान्यावर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी सामान्य नागरीकातून होत आहे.

शुक्रवारी १२ मार्च रोजी जोगेश्वरी येथे एका खासगी रूग्णालयात उपचार घेतलेल्या १६ वर्षीय युवकाचा म्रुत्यु झाला. ही घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा जैविक कचऱ्याचा प्रश्न समोर आला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून, हा प्रकार थांबवून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.

या प्रकाराची माहिती आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवताच तालुका वैद्यकीय अधिकारी संग्राम बामणे, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार आर एम बांगर, धिरज काबलीये, पोलीस नाईक संजय हंबीर, उपसरपंच पोपट हांडे, श्रीकृष्ण भोळे, कचरा व्यवस्थापन करणाऱ्या महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे प्लान्ट हेड शैलेश चांदेकर, कैलाश चव्हाण, दिपक दाभाडे आदींनी धाव घेत पाहणी केली.

या दरम्यान आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी देखील स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधूकर सावंत यांनी दिली. यावेळी विजय सरकटे, गौरव पाटील, ज्ञानेश्वर भगत, अमोल नाईक, विशाल पवार, बी जी गायकवाड, आंगत जाधव आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!