Share

कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या महेश लांडगेंच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडचा जोरदार आक्षेप

Published On: 

पुणे – राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती काहीअंशी नियंत्रणात आली असल्याचे चित्र असले तरीही अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनदेखील काही ठिकाणी अतिशय बिकट परीस्थिती असल्याचे समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अजूनही काही ठिकाणी बेड,ऑक्सिजन इत्यादी मिळत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना काळात अचानक रुग्णांची संख्या वाढली आणि मग ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे 80 टक्के वापरला जात होता. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचले.

आता कोविडमुळे बिकट बनलेली परिस्थिती आता काहीशी सुधारू लागताच कंपन्यांना ऑक्सिजन कसा मिळेल यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसून येत आहेत.कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे अशी कारणे देवून या औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच यासंदर्भात मागणी केली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांना मागणीचे तसे निवेदन दिले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना हॉस्पिटलसाठी प्रामुख्याने 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कंपन्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनवर मर्यादा आणली होती. परंतु, आता पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत आहे,त्यामुळे या औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी लांडगे यांच्या या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. शिंदे म्हणाले, ऑक्सिजनचे महत्त्व कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला समजलं. ऑक्सिजन अभावी हजारो लोक फक्त महाराष्ट्रात तडफडून मरण पावली. अडचणीच्या काळात उद्योग व्यवसायासाठी चालणारा कंपन्यातील ८०% ऑक्सीजन माणसांना वापरला गेला. इतर राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा ऑक्सिजन अडचणीच्या काळात मागवावा लागला. महाराष्ट्रावरचे संकट अजून तळलेले नाही वेगळी वेगळी महामारी तोंड वर काढत आहे. त्यामुळे सध्याची औद्योगिक ऑक्सिजन वापरण्याची परिस्थिती काही काळ चालूच ठेवली पाहिजे. कारण कोरोना रुग्णांचा आकडा सध्या जरी कमी असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे…!

शिंदे म्हणाले, टाळेबंदी उठवून लोकांना जर बाहेर पडण्याच्या सवलती मिळाल्या परत कोरोना महामारी पसरू शकते. उद्योग, कामगार जगलाच पाहिजे. मात्र त्याअगोदर माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे. माणूस जिवंत राहिला तर सगळं व्यवस्थित चालू राहू शकतं. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकार यांना विनंती आहे की, औद्योगिक व्यवसाय चालू करण्याच्या गडबडीत माणसाचा ऑक्सिजन बंद करू नका.

महाराष्ट्र अजूनही कृत्रिम ऑक्सिजन स्वयंपूर्ण नाही. कोरोना काळात औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे 80 टक्के वापरला जात होता. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. महामारी चा प्रादुर्भाव पाहता परत रुग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गडबडीत त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करण्याचा निर्णय घेऊ नये महाराष्ट्रातील जनता आजही ऑक्सिजन बेड साठी तडफडत आहे हे विसरून चालणार नाही असे देखील शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!