Share

ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल

Published On: 

नवी दिल्ली : बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे.  मात्र अशातच आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटही (RTGS) सुविधा डिसेंबर महिन्यात लागू करण्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. 14 डिसेंबरपासून ही सुविधा लागू होणार आहे. डीजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरटीजीएस प्रणाली वर्षाचे सर्व दिवस 24 तास उपलब्ध केली जाणार आहे. याची सुरुवात 14 डिसेंबर पासून होणार आहे. याआधी या प्रणालीत सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. फक्त महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारी हे उपलब्ध नाही.

दरम्यान, आरटीजीएस हे मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये दोन लाख रुपयांपेक्षा कमी पैसे पाठवत येत नाही. आपण ऑनलाईन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. मात्र ब्रांचमध्ये (RTGS) मधून फंड ट्रान्सफर केल्यानंतर शुल्क द्यावं लागतं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!