मध्य प्रदेश : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना आजाराचे जगभरामध्ये असंख्य बळी ठरले आहेत. तर जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट देखील उसळली आहे. अद्याप या आजारावर लस देखील उपलब्ध झालेली नाही त्यामुळे सोशल डिस्टंसिंग का पालन करणारी मास्काचा वापर करणं अत्यंत गरजेचे आहे.
मात्र, अद्याप देखील अनेकांना त्याचे गांभीर्य दिसून येत नाही त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांकडून लोकांना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. मात्र, लोकांकडून करोना नियमांची पायमल्ली होत असून, मास्क न लावताच लोक फिरताना दिसत आहेत.
जगभरात कोरोनाने थैमान घाताले आहे. जगातील अनेक देश या विषाणूच्या अजूनही विळख्यात आहेत. असे असले तरीही बऱ्याच ठिकाणी लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळं प्रशासनानं वारंवार आवाहन करुनही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात मास्क न वापरता कोणी आढळून आल्यास त्याला अनोखी शिक्षा करण्यात येणार आहे. विनामास्क आढळल्यास संबंधितांची थेट खुल्या कारागृहात रवानगी होणार आहे. यासोबतच्या त्या व्यक्तीला कोरोना महामारीवर निंबध लिहावा लागणार आहे.
ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष अभियान राबवले आहे. कोरोना विषयक जनजागृती करण्यासाोबतच विनामास्क आढळणाऱ्यांची रवानगी थेट खुल्या कारागृहात केली जाणार आहे. शनिवारी 20 नागरिकांना रुपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात पाठवण्यात आलं, त्यांच्याकडून कोरोनाविषयी निबंध लिहून घेण्यात आला. रिकांना रुपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात पाठवण्यात आलं, त्यांच्याकडून कोरोनाविषयी निबंध लिहून घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- नगरच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करणार – हसन मुश्रीफ
- फक्त महाराष्ट्रातच नाही तर मोदींच्या वाराणसीमध्ये देखील भाजपचा दारूण पराभव !
- अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!
- #Happy Birthday : यॉर्करकिंग बूम ! बूम ! बुमराह…
- शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज – दादा भुसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

