Share

कृषी कायदे रद्द होणारच नाहीत; चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना उत्तर

Published On: 

पुणे:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला आहे. पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं ठाम वक्यव्य भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना दादांनी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पण असं असलं तरी कायदा रद्द होणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!