Share

पाच हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला रंगेहाथ पकडले

Published On: 

उस्मानाबाद – राज्यात मागील काही दिवसांपासून लाच घेण्याचे प्रमाण वाढत आहे. उस्मानाबादेत घडलेली ही घटना याचे पुरावे देते. उस्मानाबाद येथील एका आरटीओ एजंटला टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांची ड्राइविंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन लायसन्स मिळवून देण्यासाठी पाच हजार लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

तक्रारदार व त्यांचे दोन मित्र असे तिघांचे टू व्हीलर व फोर व्हीलरचे लर्निंग लायसन्ससाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी करत, ती स्वीकारल्याची  त्यांनी मान्य केले. तक्रारदार आणि त्याच्या एका मित्राचे टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांची ड्रायविंग टेस्टची ऑनलाईन तारीख घेऊन परमनंट लायसन्स मिळवून देण्यासाठी आरटीओ एजेंट ओंकार नागनाथ थोरबोले परांडा यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ती रक्कम स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

मागील काही काळात सरकारी कार्यालयात वाढत चाललेल्या लाच घेण्याच्या  प्रकाराला चाप बसने खुप गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी अशा घटना घडत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडतांना दिसत आहे. येणाऱ्या काळात अशा घटना न घडावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे का ? हा येणारा काळातच सांगेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!