🕒 1 min read
धुळे : मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने धुळ्यातील नरडाण्यात तुफान राडा केला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना तरुण आणि तरुणी संशयास्पद आढळून आले. त्याबाबत चौकशी केल्याच्या रागातून मद्यधुंद महिलेने रस्त्यावरच पोलिसांशी हुज्जत घातली.मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाण्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जुने टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शितलच्या पुढे अलका किशोर पाटील (वय 40, रा. डोंगरे महाराजनगर धुळे) आणि हातनूर (ता.शिंदखेडा) महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील (वय 31) हे दोघे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधळ घालत होते.
जुन्या टोल नाक्याजवळ महामार्गावर विवाहित तरूणी व एक तरूण दारूच्या नशेत रस्त्याच्या मध्ये आडवे होवून वाहन धारकांना त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नरडाणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद पाटील हे त्याठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना हे दोघं महिला आणि तिचा दीर आक्षेपार्ह स्थितीत बसलेले आढळुन आले.
शरद पाटील यांना त्या दोघांनी मद्यपान केल्याचं समजताच दोघांना तिथून निघून जायला सांगितलं. याचा राग आल्यानं महिलेनं उपनिरीक्षक पाटील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.यानंतर महिला पोलिसाला बोलविण्यात आले. त्या महिला पोलिसालाही मद्यपी महिलेने अश्लील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. या प्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १०० टक्के माफ; परभणी मनपाचा निर्णय
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
