Share

वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण

Published On: 

औरंगाबाद: घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या पायरीवर एक व्यक्ती पडून होता. त्याच्या पायाला जखम झाली होती, त्या जखमेला मुंग्या लागल्या होत्या, माश्या घोंगावत होत्या, वेदनेने विव्हळत तो तिथे पडून होता, पण कोणाचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही. ज्यांचे लक्ष गेले ते बघून न बघितल्यासारख करून पुढे निघून जात होते. काही माणुसकी जिवंत असणाऱ्या व्यक्तींनी तेथील अपघात विभागाच्या डॉक्टरांकडे या संबंधीची माहिती दिली, पण डॉक्टर तिथे वेळेवर गेले नाहीत. आणि अखेर त्या व्यक्तीने तिथेच आपले प्राण सोडले.

औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर ही घटना घडली. त्याच्या जखमेला अक्षरशः मुंग्या लागल्या होत्या. वेदनेने विव्हळत होता, पण तातडीने त्याला उपचार मिळाले नाहीत. दोन इसमांनी तेथील डॉक्टरांना याची माहिती दिली, पण कोणी वेळेवर तिथे आले नाही. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, त्या व्याक्तीला कोणीतरी घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. नंतर त्या व्यक्तीला अपघात विभागात दाखल केले आणि तपासणी करून मृत घोषित केले. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे इतर रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे की काय असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे. तो व्यक्ती तिथे विव्हळत पडलेला असताना तिथे एका कोरोना रुग्णाला दाखल करण्यात येत होते, तेव्हा तेथील अपघात विभागाच्या डॉक्टरांना तसेच ‘आरएमओ’ यांना सुद्धा त्या व्यक्ती बद्दल माहिती कळवली होती, मात्र दोन तासांपर्यंत कोणीही आले नाही, अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेले किशोर वाघमारे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!