Share

नांदेड ते जालना द्रूतगती मार्गासाठी ७ हजार कोटी, समृद्धी महामार्गाशी जोडणार

Published On: 

नांदेड : राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याला राज्य सरकारकडून काहींना काही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी राज्यातील जनतेत ही उस्तहाचे वातावरण दिसून येत आहे. या अर्थसंकल्पातून नांदेड जिल्हासाठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे नांदेड ते जालना या २०० कि.मी. लांबीच्या द्रूतगती जोड महामार्गाच्या कामासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यामुळे नांदेड जिल्हा थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने जिल्हावासीयांचे दळणवळण सुलभ होणार आहे.

यामुळे नांदेड ते मुंबई तसेच औरंगाबाद प्रवासासाठी वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे माल वाहतूकीलाही अधिक वेगवान मिळणार असून समृद्धी महामार्गाची थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टीव्हीटी राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद केल्याने नांदेड समृद्धीशी जोडण्याच्या संकल्पनेला गती येणार आहे. या उपक्रमांतर्गत समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रूतगती मार्गाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची वेगवान कनेक्टीव्हीटी मिळेल. या प्रकल्पामुळे नांदेड-औरंगाबाद तसेच नांदेड-मुंबई या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!