Share

शासनाच्या 3 कोटींवर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन तहसीलदार यांनी कुळ जमीन विक्री व्यवहारास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन करून खरेदीदारांकडून जमिनीच्या रेडीरेकनर दरानुसार निम्मी रक्कम वसूल केली नसल्यामुळे शासनाचा तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

या प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

याप्रकरणी महिनाभरात दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणामुळे महसूल बुडवण्यात सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!