Share

औरंगाबाद मनपा; कोर्टात शपथपत्र न दिल्याने निवडणूक लांबणीवर

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण मंगळवारी (दि.९) प्रबंधक यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दिनांक ४ मार्च २०२१ रोजीच्या अहवालाप्रमाणे अद्याप सदर प्रकरणात राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग तसेच मनपा यांच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

केवळ राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचे काम करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज यापूर्वी सादर केलेला आहे. माननीय प्रबंधक आता सदर प्रकरणात पुढील तारीख द्यायची किंवा याचिका न्यायपीठासमोर सुनावणीसाठी वर्ग करावयाची याबाबत निर्णय घेतील. सदर निण-य सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यावर प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

मनपा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच न्यायालयात शपथ पत्र दाखल होत नसल्याने तारखे वर तारीख इतकाच सध्या बघायला मिळत आहे. निवडणुकीसाठी अनेक इच्छुक तयार असून ते मोर्चे बांधणी देखील करत आहे. परंतु, निवडणुकी संदर्भात न्यायालयाचा निकाल लागत नसल्याने, आता काय करावे इतकाच प्रश्न त्यांच्या मनात असल्याचे सांगत आहे.

आजची तारीख पुढे वाढली आहे, त्यातच सरकारी फर्मानानुसार प्रशासकांना मुदतवाढ मिळाली आहे. न्यायालयात शपथ पत्र दाखल करण्यासंदर्भातली परिस्थिती अशीच राहिली. तर दिवाळीच्या आस पास निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!