🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संसर्गाने देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवेचा तुटवडा निर्माण होत आहे. अशातच बॉलीवूड अभिनेत्री संभावना सेठने तिच्या वडिलांच्या मृत्युला रुग्णालय जबाबदार आसल्याचा आरोप केला आहे.
अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्ली येथील जयपुर गोल्डन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर ८ मे रोजी कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर काही दिवसानी संभावना सेठने एक व्हिडीओ शेअर करत रुग्णालयातील परिस्थीती दाखवली. या व्हिडीओत संभावनाने असे म्हणले आहे की,’पांढरा कोट घालणारे सगळेच देव नसतात. यांनीच माझ्या वडिलांना मारले असे म्हणत संभावनाने रुग्णालयाला तिच्या वडिलांच्या मृत्युला जबाबदार धरले आहे.
https://www.instagram.com/p/CPKvFeHneUm/
हा व्हिडीओ संभावणाने इन्स्टाग्राम अकांउटवर शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओनंतर रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही. संभावना सेठच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याना दिल्लीमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता. त्यावेली सोशल मीडियावरून संभावनाने मदत मागितल्यानंतर दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
- १ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार ? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती…
- मोठी बातमी! बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव
- अफरीदीची मुलगी अडकणार लग्नबंधनात ; जावई आणि मुलीच्या नात्याबद्दल केला खुलासा
- ‘पति पत्नी और वो’ ; धनश्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
