Share

Girish Mahajan | “ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता”

Published On: 

जळगाव :  वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधरी पक्षनेत्यांना टार्गेट करत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते हा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचं बोलतं आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन ?

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. महाविकास आघडी सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर चांगलाच पलटवार केला आहे. गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ होता –

ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ होता. त्यांनी दारू वरचा टॅक्स कमी करावा यासाठीही बैठका घेतल्या. परंतू ज्या प्रकल्पातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, अशा प्रकल्पासाठी त्यांना वेळ देता आला नाही. आणि आता आमच्यावर आरोप करत आहेत,असं म्हणत महाजनांनी ठाकरे सरकारला चांगलंच फटकारलं आहे. पुढे ते बोलताना असंही म्हणाले की, जे आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांनी ते स्वत: सत्तेत असताना काय केलं आहे, हे आधी पाहावं मग आमच्यावर आरोप करावेत.

तसेच,निवडणूकांच्या वेळी भाजपसोबत युती करत नरेंद्र मोदींना भाषणासाठी बोलवून आपले अठरा-अठरा खासदार निवडून आले आहेत. नाहीतर आपले दोन सुद्धा खासदार निवडणून आले नसते, असं म्हणत महाजनांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!