औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेतील अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदाही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२०) जाहीर करण्यात आला. त्यात तीन वर्षाच्या तुलनेत यंदा बारावी निकालाची टक्केवारी वाढली आहे. मात्र दहावीचा निकाल घसरला आहे.
बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २०१९ ला औरंगाबाद विभागाचा २८.१६ टक्के लागला होता. तर २०२० मध्ये हा निकाल घसरला आणि २७.६३ टक्क्यांवर गेला होता. मात्र तीन वर्षांच्या तुलनेत यंदा २०२१ मध्ये झालेल्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकालाची टक्केवारी वाढली असून बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल ३६ टक्के एवढा लागला.
दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल मात्र घसरला
दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल पाहिला तर २०१९ यावर्षी २८.२५ टक्के लागला होता. २०२० मध्ये मात्र दहावी पुरवणी परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली असून ३९. ११ टक्के दहावीचा निकाल लागला होता. तर यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल मात्र घसरला आहे. यंदा ३१.६४ टक्के एवढा लागला आहे.
मंडळनिहाय बारावीचा निकाल वाढला मात्र दहावीचा निकाल घसरला
पुरवणी परीक्षेच्या मंडळनिहाय निकालाची टक्केवारी पाहिली तर यंदा बारावी पुरवणी परीक्षेचा निकालाची टक्केवारी वाढली आहे. परंतु दहावीचा निकाल घसरला आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेत २०१९ ला औरंगाबाद सह पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ मंडळाचा एकूण निकाल २३.१७ टक्के लागला होता. तर २०२० मध्ये निकाल घसरला आणि १८.४१ टक्के एवढा लागला. तर यंदा २०२१ ला मात्र निकालाची टक्केवारी वाढून २५.८७ एवढा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काय फालतूपणा…! राज्यसरकारच्या ‘त्या’ निर्णयावर आरोह वेलणकर भडकला
- ‘आता हा घोटाळा उघड करा’; संजय राऊतांचं सोमय्यांना ओपन चॅलेंज
- ‘मोदी सरकारचे १०० कोटी आणि ठाकरे सरकारचे १०० कोटी किती फरक आहे पाहा’
- रितेश देशमुख सुध्दा झाला होता बेरोजगार; धक्कादायक खुलासा…!
- आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं ठाकरे सरकार घोटलोंकी सरकार- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

