Share

मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा : खासदार संभाजीराजे

Published On: 

पुणे : खासदार संभाजीराजे भोसले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि MPSC च्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. छत्रपती म्हणाले क, ‘कोरोना विषय संवेदनशील आहे. पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही. एसइबीसी कायदा लागला नसला तरी परीक्षा लांबवून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कमिटी बोलावून निर्णय घ्यावा. २१ मार्चला परीक्षा होणे गरजेचे आहे. मराठा समाजातल्या मुलांचंही हेच म्हणणे आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणावर जो काही निकाल द्यायचा आहे तो याच टप्प्यातच लावावा, सहा महिने वगैरे आता चालणार नाही. अशोक चव्हाण यांना हेच सांगायचंय की इकडंचं तिकडे करत जाऊ नका. कमिटीत तुम्ही होते तर तुम्हाला नीट विषय मांडता का येत नाही? निकाल लवकर लावा. राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही, मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा,’ असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.

तसेच काळ दिवसभर चर्चेत राहिलेल्या आणि MPSC च्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘विद्यार्थ्यांच्या खेळ करू नका, १०२ चं घोडं पुढे करून चालणार नाही. १०२ चा कायदा झाला तेव्हा चव्हाण का बोलले नाही. राज्यसभेत पारित झालंय, की राज्याचे अधिकार काढून घेतले जाऊ शकत नाहीत. तेव्हा आरक्षणचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं. हे आता फक्त राज्याच्याच हातात आहे. सॉलिसिटर जनरलने आरक्षण कायदाच अवैध असल्याचं SC मध्ये सांगितले आहे.’ असे ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!