मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू स्वगृही परतले.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. स्पर्धा स्थगित होताच उर्वरीत स्पर्धा आयोजीत करण्यासाठी विविध पर्याय समोर येऊ लागले. मात्र बीसीसीआयने याबद्दल कोणताही खुलासा केला नाही. यादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष गागुंलीने उर्वरीत आयपीएलस्पर्धेबाबत खुलासा करताना म्हणले आहे की, ‘उर्वरीत आयपीएल स्पर्धा ही भारतात आयोजीत करणे शक्य नाही, मात्र बीसीसीआयने इंग्लंड, युएई, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यापैकी एका ठिकाणी उर्वरीत स्पर्धा आयोजित करण्याच्या विचारात आहेत.’
यावेळी बोलताना गागुंली असेही म्हणाला की ‘ही स्पर्धा नेमकी केव्हा होणार हे मात्र अद्यापही सांगणे शक्य नाहीये. तसेच गतवर्षी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणे देखील आमच्यासाठी एक आव्हानच होते.’ आयपीेएल २०२० नंतर बीसीसआयने विजय हजारे ट्रॉफी, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा यशस्वीरित्या पार देखील पडल्या होत्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल तेवातियाने केलं खुलेआम प्रपोजल ; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
- ‘गडकरींचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनीही अंगीकारावा’
- शिवसेनेच्या झुंजार नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आईच्या आठवणीत सोनू झाला भावुक : शेअर केला आईने लिहिलेल्या पत्रांचा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
