Share

‘गडकरींचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनीही अंगीकारावा’

Published On: 

अकोला : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका ऑनलाईन बैठकीत माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य कार्यकर्त्यांना देखील एक प्रेमळ व खबरदारीचा सल्ला दिला आहे.

‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती आहे, योग्य काळजी घ्या. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जाणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत,’ असं भाष्य गडकरी यांनी बैठकीत केलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकारण केलं तर लोकांना ते आवडतं नाही. तुम्ही जे करणार आहेत. त्यांचे श्रेय तुम्हाला आणि पक्षाला मिळणारच आहे. आपल्या सेवाकार्याचा लोकांना माहित होणं इथपर्यंत प्रचार करणं गरजेचे आहे. त्यांचा फार बागुलबुवा करु नका, सध्याच्या काळात सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. यात राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका.

गडकरी म्हणाले की , सध्याच्या काळात सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. यात राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका, तुम्ही हे काम करीत आहात हे लोकांना माहित आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकारण केलं तर लोकांना ते आवडतं नाही. तुम्ही जे करणार आहेत. त्यांचे श्रेय तुम्हाला आणि पक्षाला मिळणारच आहे. आपल्या सेवाकार्याचा लोकांना माहित होणं इथपर्यंत प्रचार करणं गरजेचे आहे. त्यांचा फार बागुलबुवा करु नका, एकच आँक्सिजन सिलेंडर आहे. त्यांच्या चार कार्यक्रर्ते फोटो काढून सोशल मीडियावर पाठवत आहे, असं करु नका अशाने आपल्याबाबत लोकांचे मत वाईट होईल.

गडकरी यांनी हा सल्ला दिल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी दिलेला सल्ला सर्वांना अनुकरणीय आहे. मुत्सद्दी व संयमी असा हा नेता मला आवडतो. संघविचाराशी मी कधीच सहमत नसेल. मात्र गडकरीजीसारख्या नेत्यांचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!