नाशिक : देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रेटी,खेळाडू यांच्यासह अनेक मोठे नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत.काहींचा या विषाणूमुळे मृत्यू देखील होत आहे. यात आता शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
गाडेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होत्या. त्या तीन वेळा नगरसेविका झाल्या. पहिली निवडणूक त्यांनी १९९२ मध्ये लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर २००७ मध्ये सुभाष रोड परिसरात त्या पुन्हा नगरसेविका झाल्या.
त्यानंतर २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक २२ मधून त्या पुन्हा नगरसेविका झाल्या. त्यांच्या मागे पती लक्ष्मण गाडेकर, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी नाशिक रोड परिसरात विविध विकासकामे केली. सत्यभामा गाडेकर कोरोना काळातही जनतेसाठी झोकून देऊन काम करत होत्या. जनसेवा करतानाच अखेर गाडेकरांनाही कोरोनाने गाठले. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
दरम्यान, अवघ्या महिन्याभरापूर्वीच शिवसेनेच्या नाशिकमधील नगरसेविका कल्पना पांडे यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे महिन्याभराच्या आत नाशिक शिवसेनेसाठी हा मोठा हादरा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’


