🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले आहे.
मायदेशी परतण्याआधी सगळे खेळाडू एकत्र बसून जेवण केल्याचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी सगळे खेळाडू मजा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राजस्थानचा राहुल तेवातियाने पाण्याच्या बाटलीला प्रपोज करताना दिसतो. हा व्हिडिओ जोस बटलरची मुलगी जॉर्जियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. ज्यामध्ये सर्व खेळाडू उशी पास करण्याचा खेळ खेळताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/COprnOStSAh/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये उशी फेक खेळ चालू असताना तेवातिया या खेळात हरला म्हणून त्याला त्याची शिक्षा म्हणून त्याला बाटलीला प्रपोज करायला सांगितले आहे. या व्हिडिओत तेवातियाची मजेदार शैली पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये राहुल तेवातिया पाण्याची बाटलीला प्रपोज करत ‘आय लव्ह यू’ असे म्हणतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
