मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.
रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला आहे. त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना गुप्त अहवाल पुरवले, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांना फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
‘राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता.’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बंद पडलेल्या मॉलमध्ये कोविडसेंटर सुरू करण्यात कुणाचा फायदा होता? मनसेने डागली सरकारवर तोफ
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- संजय राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

