Share

संजय राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते.

दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य केल्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसने संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल चढवलेला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या मागणीला केराची टोपली दावली आहे. यूपीए-2 नाही तर एकच राहणार आहे. सोनिया गांधीच यूपीएचं नेतृत्व करतील. राऊतांनी काँग्रेसवर बोलण्याची गरज नाही, असं थोरात म्हणाले.

तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज कठिण दिवस असले तरी काँग्रेसला चांगले दिवस येतील. यूपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करतील. त्यामुळे राऊत म्हणतात त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

याचसोबत युपीएच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिलेच सांगितले आहे की, अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा किंवा परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे यावर शिवसेने आपली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.

महाराष्ट्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत काँग्रेसने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. हे त्यांनी यूपीएचा भाग नसल्यामुळे या संदर्भात कुठलेही भाष्य करणे गरजेचे नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!