Share

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी अस्थिव्यंग तज्ज्ञ देणार सेवा

Published On: 

परभणी :  कोरोना संसर्गाच्या वाढत्या कहराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महसूल प्रशासनाने रविवारी एका बैठकीद्वारे केलेल्या आवाहनाप्रमाणे शहरातील खाजगी अस्थिव्यंग तज्ज्ञांनी कोविड सेंटर्समधून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. त्याप्रमाणे सर्व अस्थिव्यंगतज्ज्ञांनी नियोजनानुसार वेळापत्रक तयार केले आहे. त्याप्रमाणे दररोज सेवा देखील सुरु करण्यात देखील आली आहे.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. विवेक नावंदर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले की, अस्थिव्यंगतज्ज्ञ जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नेमून दिलेल्या कोविड सेंटरर्समधून वेळापत्रकाप्रमाणे सेवा बजावणार आहेत. विशेषतः हे तज्ज्ञ शासकीय रुग्णालयातील फिजिशीयन यांना प्रामुख्याने मदत करतील. दरम्यान दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत दररोज एक अस्थिव्यंगतज्ज्ञ जिल्हा रुग्णालय, आयटीआय, जिल्हा परिषद इमारत व अन्य कोविड सेंटरमधून सेवा बजावणार आहेत, असेही या वेळी डॉ. नावंदर यांनी सांगितले.

परभणी शहरासह जिल्हाभरामजध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोव्हिड सेंटर वर सेवा बजावत असणाऱ्या डॉक्टरांच्या तसेच प्रशासकीय यंत्रणेवर खुप मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे आता शहरासह ग्रामीण बागातील अस्थि व्यंगतज्ज्ञ कोरोना रुग्णांवर उपचार करण्याऱ्या सर्व पिजिशियन यांना वैद्यकीय उपचार करण्यामध्ये मदत देखील करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!