नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या कंपनींच्या मालकांसोबतही बैठक घेतली आहे. याशिवाय त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. याच बैठकीतील निर्णयाबाबत किंवा आणखी काही दुसऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयबाबत मोदी घोषणा करण्याची शक्यता होती.
देशाला संबोधित करायला सुरुवात करतानाच त्यांनी सध्याच्या कोरोना लाटेला तुफान म्हणून संबोधले आहे. कोरोनाची हि लाट प्रचंड मोठी आहे. आणि यासाठी देशवासियांना धैर्यानी या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच ते यावेळी म्हणाले कि, ‘ तरुणांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला आपल्या देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा’ असा सल्ला पंतप्रधान मोडी यांनी यावेळी राज्यांना दिला आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देशातील डॉक्टरांशी संवाद साधला होता. तसेच आज त्यांनी लस उत्पादकांशीही संवाद साधला होता. याशिवाय त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आलेली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मजुरांनी जिथे आहे तिथेच थांबावे, स्थलांतर करू नये ; पंतप्रधानांचे आवाहन
- औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘या’ महत्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात!
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात, निर्मात्यांना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

