मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला.’मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला.मी या प्रकरणी आज दुपारी दोन वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे असं सांगत हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचं देखील ते म्हणाले.
कर नहीं तो डर किस बात का ? क्या दाल मे कुछ काला है ? https://t.co/UbHJQCGycS
— Ram Kadam (@ramkadam) December 28, 2020
दरम्यान, भाजपने मात्र या मुद्द्यावरून राऊत यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी देखील राऊत यांच्यावर निशाणा साधला. कर नहीं तो डर किस बात का ? क्या दाल मे कुछ काला है ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी संजय राऊत यांना विचारू इच्छितो, तुमचा तुमच्या कुटुंबाचा पीएमसी बँकेसोबत काही आर्थिक व्यवहार झाला होता का? काय आर्थिक व्यवहार झाला होता, तो देखील जनतेसमोर मांडावा. तुमच्याकडे या अगोदरही या संबधी काही माहिती कुठली नोटीस आली होती का? ही बाब देखील जनतेसमोर मांडावी. १० लाख लोकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकलेले आहेत. पीएमसी बँक पुनर्जीवित व्हायला हवी असे आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रकारे तिच्या लाभार्थींची देखील चौकशी व्हायलाच हवी. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- युपीएच्या अध्यक्षपदाविषयी शरद पवारांनी केले मोठे विधान
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी राहणार काँग्रेसच्या स्थापना दिनाला गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

