🕒 1 min read
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. खंडपीठाच्या मागील बाजूस नव्याने बी आणि सी विंग तयार करण्यात आले आहे. मात्र या अॅनेक्स बिल्डिंगच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला होता. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम व पत्रिकेवर वकील संघाची दखल न घेतल्याने खंडपीठ वकील संघाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर निघाले असून ३६ दिवसानंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. खरेतर ही बातमी नसून ते घरातून बाहेर पडले आहेत ही खरी बातमी असावी, असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर निघाले असून ३६ दिवसानंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे.
खरेतर ही बातमी नसून ते घरातून बाहेर पडले आहेत ही खरी बातमी असावी. pic.twitter.com/vDh8BBHrHT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 23, 2021
दरम्यान, ‘मुख्यमंत्री जी, औरंगाबाद जिल्ह्यात आहात तर पैठणच्या तोंडोळी गावाला जरूर भेट देत परवाच्या सामुहिक बलात्कार पिडीत परीवाराची भेट घ्या. त्या २० दिवसाच्या चिमुकलीची भेट घ्या जिच्या हाताला नराधमांना चटके दिलेत. कुटुंबप्रमुखांच्या भेटीने त्यांना नक्की दिलासा मिळेल व आर्थिक मदत ही, असं भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादेत दाखल, उच्च न्यायालय खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे करणार उद्घाटन
- धुळ्यात बॅनरवरील फोटोचा वाद; रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात झटपट
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल लाल किल्ल्यावरील तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे का?; शिवसेनेचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
